pm narendra modi amit shah
esakal
भारतात सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून भावना, परंपरा आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा विशेष प्रसंगी सोने खरेदी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, याच सवयीमुळे देशातील घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये प्रचंड प्रमाणात सोने साठून राहिले आहे. आता या निष्क्रिय सोन्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी उपयोग करून घेण्याचा विचार सरकार करत असल्याची चर्चा आहे.