LIC stake sale,
esakal
देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी असलेल्या एलआयसी (LIC) संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार एलआयसीमधील सुमारे ६.५ टक्के हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे. महत्त्वाचे म्हणजे यामागे कोणताही आर्थिक संकट नसून सेबीच्या नियमांची पूर्तता करण्याचा उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे. अशावेळी आपल्या शेअर्सचं किंवा पॉलिसीचं काय होणार? असे अनेक प्रश्नही नागरिकांच्या मनात निर्णय झाले आहेत.