

Mumbai Pune Travel
Sakal
Mumbai-Pune Helicopter Shuttle : मुंबई–पुणे दरम्यानचा प्रवास आता आणखी लवकर होणार आहे. रस्ते आणि रेल्वेमार्गावरील लांबचा प्रवास टाळू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी एक नवी आणि वेगवान पर्यायी सेवा सुरू झाली आहे. मुंबईस्थित Flyyo India या कंपनीने हेलिकॉप्टर शटल सेवा सुरू केली असून, अल्प अंतराचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद करण्याचा उद्देश आहे. या सेवेतून प्रवास कसा असतो, याचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे.