

RBI credit card new rules
ESakal
भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन नियमांद्वारे क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या नियमांनुसार, देय तारीख उलटून गेल्यानंतरही तुम्हाला आता दंड टाळण्याची संधी आहे. सामान्यतः बिले भरण्यास उशीर झाल्यास अनेकदा अतिरिक्त शुल्क आकारले जाते, परंतु आता असे होणार नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांनी देय तारीख चुकवल्यास बँका आता तात्काळ विलंब शुल्क आकारू शकणार नाहीत.