RBI: धक्कादायक! टाटासह 15 कंपन्यांनी NBFC नोंदणी प्रमाणपत्रे केली परत, काय आहे प्रकरण?

15 NBFCs Surrender Certificate To RBI: देशातील 15 मोठ्या कंपन्यांनी त्यांचे नोंदणी परवाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला परत केली आहेत. या कंपन्या एकतर NBFC व्यवसायातून बाहेर पडल्या आहेत किंवा त्यांचे विलीनीकरण झाले आहे.
15 NBFCs surrender certificate of registration to RBI
15 NBFCs surrender certificate of registration to RBI Sakal

15 NBFCs Surrender Certificate To RBI: देशातील 15 मोठ्या कंपन्यांनी त्यांचे नोंदणी परवाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला परत केली आहेत. या कंपन्या एकतर NBFC व्यवसायातून बाहेर पडल्या आहेत किंवा त्यांचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे त्यांची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहे.

अशा स्थितीत या कंपन्या आता कायदेशीर राहणार नाहीत. आरबीआयने त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र स्वीकारले आहे. यानंतर या कंपन्या NBFC म्हणून काम करू शकणार नाहीत. अशा परिस्थितीत ग्राहकांनीही याबद्दल माहिती समजून घेतली पाहिजे, जेणेकरून भविष्यात त्यांची फसवणूक होणार नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी सांगितले की, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस आणि रिव्हॉल्व्हिंग इन्व्हेस्टमेंट इत्यादींसह 15 एनबीएफसी अशा कंपन्यांच्या यादीत आहेत ज्यांनी नोंदणी रद्द केली आहे किंवा स्वेच्छेने व्यवसाय बंद केला आहे. त्यामुळे या NBFCचे कायदेशीर अस्तित्व संपले आहे. या व्यतिरिक्त, सहा NBFCने नॉन-बँकिंग वित्तीय संस्था (NBFI) व्यवसायातून बाहेर पडल्यानंतर त्यांची नोंदणी प्रमाणपत्रे परत केली आहेत.

15 NBFCs surrender certificate of registration to RBI
Gold Import: सोन्याची आयात 2023-24 मध्ये 30 टक्क्यांनी वाढली; कोणता देश सर्वाधिक सोने खरेदी करतो?

कंपन्यांची यादी पहा

नऊ नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) विलीनीकरण, विसर्जन किंवा सेवा स्वेच्छेने बंद केल्यामुळे कायदेशीर संस्था राहिल्या नाहीत. यामध्ये टाटा कॅपिटल फायनान्शिअल सर्व्हिसेस, टाटा क्लीनटेक कॅपिटल, नेप्रोल इन्व्हेस्टमेंट्स, यूएसजी फायनान्शिअल सर्व्हिसेस, उर्जा कॅपिटल, वंदना डीलर्स, एबीआरएन फायनान्स, जोधनी मॅनेजमेंट आणि जेडीएस सिक्युरिटी यांचा समावेश आहे.

15 NBFCs surrender certificate of registration to RBI
RBI: सरकार होणार मालामाल! रिझर्व्ह बँकेकडून मिळणार 1 लाख कोटी; अहवालात माहिती उघड

सहा NBFC ने नॉन-बँकिंग वित्तीय संस्था (NBFI) व्यवसायातून बाहेर पडल्यानंतर त्यांची नोंदणी प्रमाणपत्रे परत केली आहेत. यामध्ये विआन ग्रोथ कॅपिटल, ड्रेप लीजिंग अॅन्ड फायनान्स, ज्वेल स्ट्रिप्स, रिव्हॉल्व्हिंग इन्व्हेस्टमेंट्स, अंशू लीजिंग आणि एव्हीबी फायनान्स यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com