
देशातील 1,629 कॉर्पोरेट कर्जदारांनी 1.62 लाख कोटी रुपयांचे कर्ज जाणूनबुजून न फेडता विलफुल डिफॉल्टर म्हणून नाव नोंदवले आहे.
सरकार आणि बँका या डिफॉल्टर्सवर नवीन कर्ज घेण्यावर बंदी, इक्विटी मार्केटमध्ये प्रवेश रोखणे आणि आपराधिक कारवाई यांसारखे कडक पाऊल उचलत आहे
देशाबाहेर पळालेल्या 9 आर्थिक गुन्हेगारांची 15,298 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली असून, विलफुल डिफॉल्टर्सवर सर्व पातळ्यांवर कारवाई सुरू आहे.
Wilful Defaulters: देशातील सरकारी बँकांकडून घेतलेले कर्ज परतफेड करण्याची क्षमता असूनही जाणूनबुजून पैसे न देणाऱ्या कर्जदारांची (Wilful Defaulters) संख्या आणि त्यांच्यावर असलेले थकबाकीचे ओझे वाढत आहे. केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 1,629 कॉर्पोरेट कर्जदारांकडे एकूण 1.62 लाख कोटी रुपयांचे कर्ज थकलेले आहे.