PM Kisan Yojana: PM किसान योजनेच्या 14व्या हप्त्यापासून 3 कोटी शेतकरी राहू शकतात वंचित, जाणून घ्या कारण|3 crore farmers may be deprived of the 14th installment of PM Kisan Yojana, know the reason | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: PM किसान योजनेच्या 14व्या हप्त्यापासून 3 कोटी शेतकरी राहू शकतात वंचित, जाणून घ्या कारण

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी येणार 14वा हप्ता येणार आहे. शेतकरी पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पीएम किसान योजनेंतर्गत 14 व्या हप्त्याचे पैसे कधी येणार या बद्दल सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहीती दिलेली नाही? मात्र ही रक्कम 10 जूनपूर्वी कधीही जाहीर होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6.000 रुपये पाठवले जातात. ही रक्कम दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक हप्त्याची रक्कम 2,000 रुपये आहे. (14th installment of PM Kisan Yojana)

या योजनेअंतर्गत 13 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. मात्र, आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना तेरावा हप्ताही मिळालेला नाही.

पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून 3 कोटींहून अधिक शेतकरी वंचित राहू शकतात, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. कारण बहुतांश शेतकऱ्यांनी अद्याप EKYC अपडेट केलेले नाही आणि EKYC करणे बंधनकारक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे या शेतकऱ्यांचा पुढील हप्ता अडकू शकतो. जर तुम्ही EKYC पूर्ण केले नसेल, तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही. (PM Kisan Yojana)

EKY कसे करावे?

EKY पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तुम्ही वेबसाइटवरील कोपऱ्यातील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरा. हे भरल्यानंतर मोबाईल नंबर आणि OTP टाका. तुमचे eKYC पूर्ण होईल.

14 वा हप्ता मिळविण्यासाठी, तुम्हाला जमिनीची पडताळणी करावी लागेल. जमिनीची पडताळणी न केल्यास योजनेच्या पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकता. कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊनही तुम्ही हे काम पूर्ण करू शकता.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत अर्ज केल्यास तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, जमिनीची कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.