Investment Tips : 4 लाखांचे होतील 65 लाख, कसे ते पाहुयात...

थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ते काही खोटं नाही. एसआयपी (SIP) हे या म्हणीसाठी अतिशय उत्तम उदाहरण आहे. कारण तुमची केवळ 4 लाखांची गुंतवणूक तुम्हाला 65 लाखांचा फंड बनवून देऊ शकते.
4 lakhs will become 65 lakhs lets see how investment
4 lakhs will become 65 lakhs lets see how investment Sakal

थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ते काही खोटं नाही. एसआयपी (SIP) हे या म्हणीसाठी अतिशय उत्तम उदाहरण आहे. कारण तुमची केवळ 4 लाखांची गुंतवणूक तुम्हाला 65 लाखांचा फंड बनवून देऊ शकते. होय आम्ही खरं सांगतोय.

पण यासाठी अतिशय शिस्तीने दर महिन्याला एक रक्कम एसआयपीमध्ये गुंतवावी लागणार आहे. एसआयपीमध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो आणि त्याचा सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो जो इतर कोणत्याही योजनेपेक्षा खूप चांगला आहे.

अशा परिस्थितीत, अगदी कमी रकमेची एसआयपी करूनही तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मोठी रक्कम जोडू शकता. एसआयपीद्वारे तुम्ही 4 लाख 20 हजारांची गुंतवणूक 65 लाखांमध्ये कशी रूपांतरित करू शकता ते पाहुयात.

एसआयपीद्वारे प्रचंड नफा मिळवण्यासाठी, तुम्हाला दरमहा 1000 गुंतवावे लागतील. 1000 रुपयांची रक्कम इतकी कमी आहे की 10,000 रुपये किंवा 20,000 रुपयांचा पगार कमावणारे देखील इतके पैसे सहज वाचवू शकतात. पण तुम्हाला ही गुंतवणूक 35 वर्ष सातत्याने सुरु ठेवावी लागेल म्हणजेच वयाच्या 25 व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करा आणि वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत चालू ठेवा.

तुम्ही सलग 35 वर्ष म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे दरमहा 1000 गुंतवल्यास, तुम्ही एकूण 4 लाख 20 हजार गुंतवाल. पण 35 वर्षात 12 टक्के चक्रवाढ व्याजाचे 60 लाख 75 हजार 269 रुपये होतील. अशा प्रकारे, 60 व्या वर्षी, तुम्ही गुंतवलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम एकत्र करून 64,95,269 रुपये (सुमारे 65 लाख रुपये) मिळवू शकता.

एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते, जी बाजाराशी जोडलेली असते, त्यामुळे ती जोखमीच्या अधीन असते. बाजारात परताव्याची हमी नाही. अशा परिस्थितीत एसआयपी म्युच्युअल फंडातही परताव्याची हमी देता येत नाही.

पण बहुतेक आर्थिक तज्ज्ञांचे असे मत आहे की दीर्घकाळात एसआयपीचा सरासरी परतावा 12 टक्क्यांपर्यंत असू शकतो. कधी कधीतर हे व्याज 15 आणि 20 टक्केही असू शकते. इतका परतावा इतर कोणत्याही योजनेतून मिळत नाही. त्यामुळेच बाजारात जोखीम असूनही, गेल्या काही वर्षांत एसआयपीमध्ये लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला लागले आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com