Adani Ports: गौतम अदानींनी आणखी एक पोर्ट घेतले विकत; 3,080 कोटींना झाला करार, शेअर्समध्ये वाढीचे संकेत

Adani Ports: अदानी पोर्टने आणखी एक बंदर खरेदी केले आहे. एक्सचेंला दिलेल्या माहितीमध्ये कंपनीने गोपालपूर बंदरातील 95 टक्के हिस्सा खरेदी केल्याचे सांगितले आहे. हा करार 3080 कोटी रुपयांना झाला आहे.
Adani buy Odisha port to rs 3080 crore deal Acquires Stake In Gopalpur Ports
Adani buy Odisha port to rs 3080 crore deal Acquires Stake In Gopalpur Ports Sakal

Adani Ports: अदानी पोर्टने आणखी एक बंदर खरेदी केले आहे. एक्सचेंला दिलेल्या माहितीमध्ये कंपनीने गोपालपूर बंदरातील 95 टक्के हिस्सा खरेदी केल्याचे सांगितले आहे. हा करार 3080 कोटी रुपयांना झाला आहे. मागील सत्रात कंपनीचा शेअर 1.5 टक्क्यांनी वाढून 1281 रुपयांवर बंद झाला.

काय आहे करार?

अदानी पोर्टने 95% हिस्सा विकत घेतला आहे. अदानी पोर्ट्सने एसपी पोर्ट मेंटेनन्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 56% हिस्सा खरेदी केला आहे. एसपी पोर्ट मेंटेनन्स प्रायव्हेट लिमिटेड हा एसपी ग्रुपचा भाग आहे. याशिवाय अदानी पोर्ट्सने ओरिसा स्टीव्हडोरेस लिमिटेडकडून 39% हिस्सा खरेदी केला आहे. (Adani buy Odisha port to rs 3080 crore deal Acquires Stake In Gopalpur Ports)

गोपाळपूर पोर्ट्स लिमिटेड या बंदरावर अनेक प्रकारचे ड्राय बल्क आणि ब्रेक बल्क कार्गो हाताळले जातात. हे एक मल्टी-कार्गो पोर्ट आहे. या पोर्टवर लोखंड, कोळसा, चुनखडी, इल्मेनाइट वाळू आणि ॲल्युमिनियमसह कोरड्या बल्क कार्गोची वाहतूक होते.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, पोर्टने 7.4 दशलक्ष मेट्रिक टन (MMT) माल हाताळला आणि त्याची क्षमता 20 दशलक्ष मेट्रिक टन (MMT) आहे.

Adani buy Odisha port to rs 3080 crore deal Acquires Stake In Gopalpur Ports
RBI Rules: होळी खेळताना नोटांवर रंग लागलाय? रंगाच्या नोटांबाबत काय आहे RBIचा नियम?

चालू आर्थिक वर्षात 11.3 दशलक्ष मेट्रिक टन (MMT) कार्गो हाताळणे अपेक्षित आहे आणि 520 कोटींचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे, असे अदानी पोर्ट्सने सांगितले. (Adani Ports set to buy 95% of Odisha's Gopalpur Port for Dollar 162 million)

अदानी पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी सांगितले की जीपीएल अदानी समूहाच्या पॅन इंडिया पोर्ट नेटवर्कला मदत करेल, पूर्व किनारपट्टी विरुद्ध पश्चिम किनारपट्टी माल वाहतूक वाढवेल आणि व्यवसाय महसूल वाढवेल.

Adani buy Odisha port to rs 3080 crore deal Acquires Stake In Gopalpur Ports
Multibagger Stocks: 15 वर्षांत गुंतवणूकदार झाले करोडपती! 9 महिन्यांत तिप्पट परतावा; तुमच्याकडे आहे का शेअर?

अदानी पोर्ट्सच्या शेअर्सने एका आठवड्यात 1 टक्क्यांनी घसरला आहे. एका महिन्यात त्यात 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. तीन महिन्यांत शेअर 30 टक्क्यांनी वाढला आहे. एका वर्षात त्यात 100 टक्के वाढ झाली आहे. तीन वर्षांत हा शेअर 70 टक्क्यांनी वाढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com