

Adani Group: अदानी समूहाची नजर आता दुसऱ्या क्षेत्रावर आहे. अदानी ग्रुपने थायलंड कंपनी इंडोरामा रिसोर्सेससोबत संयुक्त उपक्रम करार केला आहे. ही माहिती सोमवारी शेअर बाजाराला देण्यात आली. अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड, अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी आणि इंडोरामा रिसोर्सेस यांनी संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. ज्यात दोघांचाही समान वाटा आहे. हे नवीन युनिट रिफायनरी, पेट्रोकेमिकल आणि केमिकलचा व्यवसाय करणार आहे.