Aditya Birla: ज्वेलरी क्षेत्रात आदित्य बिर्ला समूहाची एन्ट्री; टाटांशी करणार स्पर्धा, केली 'इतक्या' कोटींची गुंतवणूक

Aditya Birla Group: आदित्य बिर्ला समूहाने टाटांशी स्पर्धा करण्यासाठी ब्रँडेड दागिन्यांच्या किरकोळ व्यवसायात प्रवेश केला आहे. यासाठी बिर्ला समूहाने 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. आदित्य बिर्ला समूहाने नॉव्हेल ज्वेल्स या नावाने व्यवसाय सुरु केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
Aditya Birla Group
Aditya Birla GroupSakal

Aditya Birla Group: आदित्य बिर्ला समूहाने टाटांशी स्पर्धा करण्यासाठी ब्रँडेड दागिन्यांच्या किरकोळ व्यवसायात प्रवेश केला आहे. यासाठी बिर्ला समूहाने 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. आदित्य बिर्ला समूहाने नॉव्हेल ज्वेल्स या नावाने व्यवसाय सुरु केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. बिर्लाचा समूहाचा ज्वेलरी ब्रँड यावर्षी जुलैपासून सुरू होणार आहे.

कंपनीने गेल्या जूनमध्ये सांगितले होते की नॉव्हेल ज्वेल्स अंतर्गत संपूर्ण भारतात मोठ्या ज्वेलरी रिटेल स्टोअर्स तयार करणार आहे. ज्यामध्ये इन-हाऊस ज्वेलरी ब्रँड्स असतील. राष्ट्रीय ब्रँड तयार करून ग्राहकांना चांगला अनुभव देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

कुमार मंगलम बिर्ला एका निवेदनात म्हणाले की, “आदित्य बिर्ला ग्रुपचा ब्रँडेड ज्वेलरी रिटेलमध्ये प्रवेश हा विश्वासावर आधारित व्यवसाय उभारण्याचा एक महत्त्वाचा क्षण आहे. (Aditya Birla Group to launch jewellery business, Novel Jewels in July)

कुमार मंगलम बिर्ला म्हणाले की, भारतीयांच्या वाढत्या उत्पन्नामुळे ते चांगल्या दर्जाच्या दागिन्यांना अधिकाधिक प्राधान्य देत आहेत. ते म्हणाले की आम्ही रिटेल व्यवसायात आधीच काम करत आहोत आणि आता दागिन्यांचा व्यवसाय ग्राहकांच्या पसंतीतील बारकावे समजून घेण्यास मदत करेल.

Aditya Birla Group
Realty Race: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत टाटा आणि अंबानी यांच्यात 'स्पेस वॉर' सुरु; नेमकं काय आहे प्रकरण?

आदित्य बिर्लांचा नॉव्हेल ब्रँड ज्वेल्स बाजारात तनिष्क, कल्याण ज्वेलर्स, रिलायन्स ज्वेलर्स सारख्या ब्रँड्सशी स्पर्धा करेल. भारताच्या रत्न आणि दागिन्यांच्या बाजारपेठेचा एकूण देशांतर्गत उत्पादन (GDP) मध्ये सुमारे 7 टक्के वाटा आहे. ज्वेलरी मार्केट 2025 पर्यंत 90 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

जून 2023 मध्ये असे वृत्त आले होते की आदित्य बिर्ला ग्रुप ब्रँडेड ज्वेलरी रिटेलिंग व्यवसायात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. टाटाच्या तनिष्कशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीला स्वतःचा ज्वेलरी व्यवसाय सुरू करायचा आहे.

Aditya Birla Group
Upcoming IPO: ओवेस मेटल अँड मिनरल प्रोसेसिंगचा IPO 26 फेब्रुवारीला खुला होणार; काय आहे प्राइस बँड?

सुमारे 60 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या आदित्य बिर्ला समूहाच्या कंपन्यांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, हिंडाल्को, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल, आदित्य बिर्ला कॅपिटल यासारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये 1.4 लाखांहून अधिक लोक काम करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com