

Bank Lending Rates: भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या एमपीसी बैठकीत सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. त्याचा थेट परिणाम अल्पावधीतच दिसून आला. चार सरकारी बँकांनी त्यांचे व्याजदर कमी केले आहेत. या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि युको बँक यांचा समावेश आहे. बँकांच्या या निर्णयाचा फायदा त्यांच्या विद्यमान आणि नवीन कर्जदारांना होणार आहे.