Job Opportunity : कर्मचारी कपातीच्या संकटातही, 'ही' भारतीय आयटी कंपनी देतेय नोकरीची संधी |Indian IT Company Plans To Hire 1,000 Employees | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Job Opportunity

Job Opportunity : कर्मचारी कपातीच्या संकटातही, 'ही' भारतीय आयटी कंपनी देतेय नोकरीची संधी

HCLTech Indian IT Company Plans To Hire : जागतिक आयटी क्षेत्रात सुरू असलेल्या कर्मचारी कपातीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय कंपनीने अधिक कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. HCLTech ने पुढील दोन वर्षांमध्ये रोमानियामध्ये 1,000 कर्मचारी नियुक्त करण्याची योजना जाहीर केली आहे.

पीटीआयच्या अहवालानुसार, रोमानियामध्ये कंपनीचा विकास करण्याची योजना आहे. सोबतच आघाडीच्या रोमानियन विद्यापीठांसह भागीदारीद्वारे नियुक्त केलेल्या पदवीधरांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल. (Amid layoffs, HCLTech Indian IT company plans to hire 1,000 employees)

HCLTech पाच वर्षांपासून रोमानियामध्ये कार्यरत आहे आणि जागतिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी आधीच देशातील सुमारे 1,000 तरुणांना रोजगार देते. स्थानिक लोकांना तंत्रज्ञानात करिअर करण्याची अधिक संधी निर्माण करण्यासाठी कंपनी बुखारेस्ट आणि लसी  येथे आपली कार्यालये वाढवणार आहे.

"आम्ही रोमानियामधील स्थानिक तरुणांना तंत्रज्ञानात करिअर करण्याची संधी निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करत आहोत," असे HCLTech चे रोमानियाचे कंट्री लीड युलियन पडुरारू म्हणाले. रोमानियामधील कंपनीचा इंटर्नशिप कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आणि त्यांना नोकरीसाठी नियुक्त करण्यात मदत करेल.

HCLTech ने आपल्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी आणि रोमानियामध्ये अधिक लोकांना कामावर घेण्याचे पाऊल देशासाठी आणि एकूणच IT उद्योगासाठी एक सकारात्मक पाऊल आहे. हे स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक नोकरीच्या संधी प्रदान करेल आणि कंपनीला या देशात आपला व्यवसाय वाढविण्यात मदत करेल.

तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी कपात :

गुगल, अॅमेझॉन आणि मेटा यांनी गेल्या वर्षीच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली. गुगलने जानेवारीत 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. मेटा आणि अॅमेझॉनने दोन वेळा कर्मचारी कपात केली आहे ज्यामध्ये त्यांनी अनुक्रमे 21,000 आणि 27,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.