Gold Silver Price : सोन्याच्या दरात मोठी तेजी; चांदीमध्येही वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

Aajcha Sonyacha Bhav: गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत होता.
Gold Silver Rate Today
Gold Silver Rate TodaySakal

Gold Silver Price Today 31 March 2023 : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत होता. आज मात्र सोन्याच्या आणि चांदीच्या दरातही तेजी दिसून येत आहे. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. कारण परदेशी बाजारात सोन्याचे भाव वाढले आहेत.

डॉलर निर्देशांकातील नरमाईमुळे सोन्याला आधार मिळत आहे. यामुळेच एमसीएक्सवर सोन्याच्या भावात 160 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीही 350 रुपयांनी महागली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 2000 डॉलर प्रति औंस असा आहे. चांदीनेही किंचित मजबूतीसह 24 डॉलर प्रति औंस पार केली आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्या-चांदीत आणखी वाढ होणार आहे. (Latest Marathi News)

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,850 रुपये तर 24 कॅरेट साठी 59,820,रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 733 रूपये आहे. (Gold silver price update 31 March 2023 )

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 60,710 रुपये

दिल्ली - 59,820 रुपये

हैदराबाद - 59,670 रुपये

कोलकत्ता - 59,670 रुपये

लखनऊ - 59,820 रुपये

मुंबई - 59,670 रुपये

पुणे - 59,670 रुपये

नागपूर -59,670 रुपये

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.

24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Gold Silver Rate Today
Tax on FD Interest: PAN नसेल तर FD वर द्यावा लागेल दोनदा टॅक्स, जाणून घ्या काय आहे आयकर नियम?

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Gold Silver Rate Today
जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com