Anil Ambani Assets Seized : ईडीची अनिल अंबानींविरोधात सर्वात मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह देशभरातील हजारो कोटींची संपत्ती जप्त

Reliance Group : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाविरुद्ध ईडीने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. पीएमएलए कायद्यानुसार देशभरातील ₹3,084 कोटी किमतीच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.
ED officials seize assets linked to Anil Ambani’s Reliance Group worth ₹3,084 crore across multiple Indian cities under PMLA probe.

ED officials seize assets linked to Anil Ambani’s Reliance Group worth ₹3,084 crore across multiple Indian cities under PMLA probe.

esakal

Updated on

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. समूहाच्या विविध संस्थांशी संबंधित सुमारे ₹३,०८४ कोटी (अंदाजे १.५ अब्ज डॉलर्स) किमतीच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. हे जप्तीचे आदेश ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम ५(१) अंतर्गत जारी करण्यात आले होते. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये त्यांचे मुंबईतील पाली हिल, वांद्रे पश्चिमधील निवासस्थानाचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com