
ऑगस्ट 2025 मध्ये स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी आणि वीकेंडसह बँक बंद राहणार आहेत.
ग्राहकांनी रोख रक्कम काढणे, चेक क्लिअरिंग आणि इतर व्यवहार आधीच पूर्ण करून घ्यावेत.
डिजिटल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एटीएम सेवा मात्र सुरू राहतील.
Bank Holidays in August 2025: जर तुम्ही ऑगस्ट 2025 मध्ये बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे करण्याचा प्लॅन करत असाल तर, आधी सुट्ट्यांची यादी पाहा. कारण या महिन्यात बँकांच्या सुट्ट्या नेहमीपेक्षा जास्त आहेत. स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी यांसारख्या सणांबरोबरच नियमित शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे काही राज्यांमध्ये बँका जवळजवळ अर्धा महिना बंद राहतील. त्यामुळे ग्राहकांनी रोख रक्कम काढणे, चेक क्लिअरिंग किंवा इतर व्यवहार वेळेत उरकून घ्यावेत, अन्यथा अडचण येऊ शकते.