Bank FD: बँक FDमध्ये गुंतवणूक करताय? जास्त व्याजदर असूनही गुंतवणूक करण्याचे आहेत तोटे, जाणून घ्या

बँक मुदत ठेवी (FDs) हा भारतात गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे.
Bank FD
Bank FDSakal

Bank Fixed Deposits: बँक मुदत ठेवी (FDs) हा भारतात गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. बहुतेक भारतीय नियमितपणे FD मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. मे 2022 पासून वाढत्या FD व्याजदरामुळे देखील हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय बनला आहे.

केवळ पगारदार वर्ग किंवा ज्येष्ठ नागरिकच नव्हे, तर इतर लोकही मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवत आहेत.

तज्ज्ञांचे असे मत आहे की गुंतवणुकीचा उत्तम पर्याय असूनही, एफडीमध्येही काही त्रुटी आहेत. त्यामुळे गुंतवणूकदाराने याची जाणीव ठेवली पाहिजे.

एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत आणि काही तोटेही आहेत. आज आम्ही तुम्हाला FD मध्ये गुंतवणूक करण्याचे 9 तोटे सांगणार आहोत.

1. कमी परतावा

मुदत ठेवींमध्ये गुंतवणुकीचा तोटा असा आहे की मुदत ठेवींवर निश्चित व्याज दिले जाते, जे सहसा स्टॉक किंवा म्युच्युअल फंडांसारख्या इतर गुंतवणूक पर्यायांद्वारे ऑफर केलेल्या परताव्यापेक्षा कमी असते.

2. निश्चित व्याजदर

मुदत ठेवीची आणखी एक कमतरता म्हणजे व्याजदर अर्जाच्या वेळी निश्चित केला जातो. जेव्हा तुम्ही ठराविक व्याजदराने FD उघडता तेव्हा तुम्हाला त्या दराने मुदत संपेपर्यंत व्याज मिळत राहते.

3. लॉक-इन-पीरियड

एकदा तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक केली की, तुमचे पैसे ठेवीच्या कालावधीसाठी लॉक केले जातात. याचा अर्थ असा की तुमची मुदत संपेपर्यंत तुम्ही तुमच्या पैशांचा वापर करु शकत नाही, जरी तुम्ही आर्थिक आणीबाणीत असलात तरीही.

Bank FD
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचा बँकांना दिलासा! फ्रॉड घोषित करण्यापूर्वी कर्जदारांचे म्हणणं...

4. TDS

तुम्ही FD वर मिळवलेले व्याज हे करपात्र उत्पन्न आहे. याचा अर्थ तुम्हाला मिळालेल्या व्याजावर कर भरावा लागेल. FD व्याज ‘Income from Other Sources' या श्रेणीत येते.

5. महागाई

कर विचारात घेतल्यानंतरही, गुंतवणुकीवरील परतावा हा महागाईच्या दरापेक्षा अधिक असावा. एफडीवरील व्याजदर हा महागाईच्या दरापेक्षा कमी असतो. अशा परिस्थितीत, जर FD महागाईपेक्षा कमी परतावा देत असेल, तर त्यात गुंतवणूक करणे चांगले नाही. तुमच्या FD वरील व्याजदरापेक्षा महागाईचा दर जास्त असल्यास, तुमच्या पैशाचे मूल्य कालांतराने घसरते.

6. तरलता

तुम्हाला FD मध्ये तरलतेची समस्या आहे. जर तुम्ही गरजेच्या वेळी एफडी तोडली तर तुम्हाला त्यावर प्री-मॅच्युअर पेनल्टी भरावी लागेल.

7. भांडवली नफा नाही

तुम्हाला FD वर कोणताही भांडवली नफा मिळत नाही.

8. बँक दिवाळखोर होऊ शकते

एफडी ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, परंतु बँक दिवाळखोरीचा धोका नेहमीच असतो. असे झाल्यास, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा सर्व किंवा काही भाग गमावू शकता.

9. मुदतपूर्व पैसे काढल्यास दंड

बँका ठेवीदारांना त्यांच्या FD मधून मुदतपूर्व पैसे काढण्याचा पर्याय देतात. त्यांना मुदतीपूर्वी पैसे काढण्यासाठी शुल्क भरावे लागते.

Bank FD
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com