Bank Loan Guarantor
Sakal
Personal Finance
Banking : मित्र किंवा नातेवाईकाच्या बँक लोनसाठी गॅरंटर होण्याचा विचार करताय? तर हे नक्की वाचा नाहीतर येऊ शकतं मोठं संकट!
Bank Loan Guarantor : बँकेतून लोन घेताना अनेकदा गॅरंटरची मागणी केली जाते. कर्जदाराने पैसे न भरल्यास, बँक त्या गॅरंटरकडून वसुली करू शकते. त्यामुळे जर तुम्ही कोणाच्याही लोनसाठी गॅरंटर बनण्याचा विचार करत असाल, तर हे नक्की जाणून घ्या.
Bank Loan Risk : बँक कर्ज (लोन) घेण्यासाठी तुमचा CIBIL स्कोअर चांगला असावा लागतो. त्यासोबतच उत्पन्नही नियमित असेल, तर बँक आपल्याला सहज कर्ज देते. पण काही वेळा बँक लोन घेणाऱ्याकडे गॅरंटर (हमीदार) मागते. अशावेळी आपले नातेवाईक, मित्र किंवा ओळखीच्या व्यक्ती आपल्याला गॅरंटर होण्यासाठी विनंती करतो आणि संबंधामुळे आपण होकार देतो. पण तुम्ही गॅरंटर बनताना काही गोष्टी समजून घेतल्या नाही तर पुढे तुमच्यावर मोठं आर्थिक संकट ओढवू शकतं.

