
बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम 2025 अंतर्गत एकूण 5 बँकिंग कायद्यांमध्ये 19 मोठे बदल करण्यात आले आहेत, जे 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहेत.
संचालकांचा कार्यकाल वाढवला गेला आहे, अनक्लेम्ड रक्कम IEPF ला ट्रान्सफर करता येणार आहे.
नव्या कायदेशीर तरतुदींमुळे भारतीय बँकिंग सेक्टरचे गव्हर्नन्स स्ट्रक्चर अधिक बळकट होणार आहे.
New Banking Laws: भारत सरकारने ‘बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम, 2025’ मधील महत्त्वाच्या तरतुदी 1 ऑगस्ट 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अधिनियम 15 एप्रिल 2025 रोजी अधिसूचित करण्यात आले होते, आणि यामध्ये वेगवेगळ्या कायद्यांमध्ये एकूण 19 दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.