
1 सप्टेंबरपासून गॅस सिलेंडर, पोस्ट सेवा, FD, क्रेडिट कार्ड आणि ITR संदर्भातील नवे नियम लागू झाले आहेत.
कमर्शियल सिलेंडर स्वस्त झाला आहे, रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद होऊन स्पीड पोस्टमध्ये विलीन झाली आहे.
क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड्समध्ये बदल आणि ITR भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
Rule Change 1 September 2025: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सरकारने अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. 1 सप्टेंबरपासून काही नवे नियम लागू झाले असून काही नियम या महिन्याच्या अखेरपर्यंत लागू होणार आहेत. चला जाणून घेऊया कोणते बदल झाले आहेत आणि त्याचा ग्राहकांवर कसा परिणाम होणार आहे.