Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Sugar Supply Shortage & Price Hike: १ महिन्यात साखर ३५% महाग! साठेबाजी रोखण्यासाठी क्विक-कॉमर्स आणि सुपरमार्केट्सकडून खरेदीवर मर्यादा; D-Mart आणि Reliance Retail चाही निर्णय...
Blinkit and Zepto 5 kg sugar purchase limit during festive season

Why Blinkit, Zepto & DMart Are Capping Sugar Sales Ahead of Ganesh Utsav 2026

esakal 

Updated on

Blinkit & Zepto Limit Sugar Purchases to 5kg: गणेशोत्सव आणि सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशात साखरेचा पुरवठा कमी झाल्यामुळे आणि किरकोळ किमतींमध्ये अचानक प्रचंड वाढ झाल्याने ऑनलाइन क्विक-कॉमर्स ॲप्ससह मोठ्या सुपरमार्केट्सनी साखर खरेदीवर मर्यादा घातली आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २६ जुलै रोजी ४८ रुपये प्रति किलो असलेली साखर २६ ऑगस्ट रोजी ६५.०५ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. म्हणजेच फक्त ३० दिवसांत साखरेचे दर ३५.५% पेक्षा जास्त वाढले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com