Budget 2024 : बजेटकडून नोकरदारांना आहेत 'या' 5 अपेक्षा, सरकार पूर्ण करणार का?

Budget 2024 Expectations : अगदी दोन दिवसात सादर होणाऱ्या बजेटमध्ये सरकारकडून काहीतरी दिलासा दिला जाईल याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात.
budget 2024 five expectations of salaried class from this year budget martahi News ra
budget 2024 five expectations of salaried class from this year budget martahi News ra

Budget 2024 Expectations : नोकरदार लोकांना बजेटकडून अनेक अपेक्षा असतात. महिन्याचा खर्च मिळणाऱ्या पगारात भागवणे हे अनेक नोकरदारांसाठी अवघड काम असतं. काही लोक या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करतात, तर काही जणांना यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. दरम्यान अगदी दोन दिवसात सादर होणाऱ्या बजेटमध्ये सरकारकडून काहीतरी दिलासा दिला जाईल याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात.

यावेळचे बजेट हे अंतरिम बजेट असणार आहे त्यामुळे एक्सपर्ट अंदाज व्यक्त करत आहेत की सरकार काहीतरी मोठी घोषणा करु शकते. दरम्यान आज आपण सॅलरी क्लास लोक सरकारकडून या बजेटमध्ये कोणत्या अपेक्षा ठेवून आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

या आहेत अपेक्षा

  • सरकारने कर प्रणालीसाठी एकच स्लॅब तयार करण्याचा सरकारने विचार करावा. सध्या नवीन आणि जुने स्लॅब यांच्यामध्ये गोंधळ होत आहे.

  • पीपीएफची मर्यादा वाढवणे आणि व्याजदर वाढवणे यावर विचार केला पाहिजे.

  • कलम 80C आणि 80D अंतर्गत कपातीची मर्यादा वाढवली पाहिजे.

  • सरकारने स्टँडर्ड डिडक्शन वाढवण्याकडेही लक्ष दिले पाहिजे.

  • अधिक समानता प्राप्त करण्याच्या प्रयत्नात टॅक्स स्लॅब तर्कसंगत ठेवले पाहिजेत.

budget 2024 five expectations of salaried class from this year budget martahi News ra
Budget 2024: अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

आजही देशातील लाखो भारतीयांमध्ये टॅक्स स्लॅबबाबत संभ्रम आहे. जेव्हा आपण कर भरण्यास पात्र होऊ तेव्हा आपल्यासाठी कोणता कर व्यवस्था अधिक चांगला पर्याय असेल याबद्दल अनेकांना संभ्रम आहे. त्यामुळे सरकारने एक स्टँडर्ड कर व्यवस्था बनवण्याचा विचार केला पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे नवीन आणि जुने कर व्यवस्था निवडताना सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही.

सरकार या अंतरिम बजेटमध्ये 80C आणि 80D अंतर्गत कर सूट वाढवू शकते. या अर्थसंकल्पात सरकार कराशी संबंधित मोठा निर्णय घेईल, असे वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांचे मत आहे. मात्र असे होण्याची शक्यता फारच कमी आहे.

budget 2024 five expectations of salaried class from this year budget martahi News ra
Budget 2024: अर्थसंकल्पानंतर 'या' क्षेत्रांच्या शेअर्सवर पडेल पैशांचा पाऊस; गुंतवणुकीची मोठी संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com