Pakistan Currency: पाकिस्तानातही नोटाबंदी? नव्या नोटा चलनात आणण्यासाठी दिले आदेश, काय आहे कारण

Pakistan New Currency Notes: चलनाचे घसरलेले मूल्य आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान आता नव्या चलनी नोटा जारी करणार आहे. सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानने लवकरच नवीन नोट जारी करणार असल्याची घोषणा केली आहे.
Pakistan Currency
Pakistan CurrencySakal
Updated on

Pakistan New Currency Notes: चलनाचे घसरलेले मूल्य आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान आता नव्या चलनी नोटा जारी करणार आहे. सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानने लवकरच नवीन नोट जारी करणार असल्याची घोषणा केली आहे.

पाकिस्तान सध्या रोखीच्या संकटाचा सामना करत असल्याचे सांगण्यात आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बनावट नोटा, ज्यांच्या वापरामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद म्हणाले की, नवीन नोटा आंतरराष्ट्रीय प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. पाकिस्तानी चलनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी त्यात विशेष सुरक्षा क्रमांक आणि डिझाइन वापरण्यात येणार आहे.

Pakistan Currency
Tata Group: परदेशी शिक्षणासाठी TATA करणार मदत; 'इतक्या' लाखांपर्यंत देणार शैक्षणिक कर्ज

पाकिस्तान दीर्घकाळापासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि त्याच्या प्रभावामुळे तेथील लोकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तिथल्या दुर्दशेची आणि गरिबीची चित्रं वेळोवेळी समोर येत आहेत. याशिवाय, पाकिस्तान सरकार आयएमएफकडून मिळालेल्या आर्थिक मदत पॅकेजची वाट पाहत होते, जे अलीकडच्या काळात मिळण्याच्या मार्गावर आहे.

पाकिस्तानात इतकी महागाई यापूर्वी कधीच नव्हती, इंधन आणि अन्नधान्याच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य माणसाला दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे. मार्चच्या सुरुवातीला सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानकडून एक अहवाल आला होता. ज्यामध्ये असे मानले जात होते की महागाई आता नियंत्रणाबाहेर आहे. येथील महागाईने 58 वर्षांतील उच्चांक गाठला आहे.

Pakistan Currency
Pension Rule: महिलांना मिळणार मोठा दिलासा! मोदी सरकारने फॅमिली पेन्शनच्या नियमात केला बदल

कर्जाची परतफेड आणि आयात खर्चामुळे, सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानकडे असलेला परकीय चलनाचा साठा तीन अब्ज डॉलरच्या खाली आला आहे. ही इतकी छोटी रक्कम आहे की ती एका महिन्याचा आयात खर्चही भागवू शकत नाही.

अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर, पाकिस्तानला IMF कडून 3 अब्ज डॉलरचा आपत्कालीन निधी मिळविण्यात यश आले. चीन, सौदी अरेबिया आणि UAE सारख्या मित्र राष्ट्रांनीही पाकिस्तानचा परकीय चलन साठा वाढवण्यात मदत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com