Stock Market: ChatGPT ने केले मालामाल! विचारले- कुठे गुंतवणूक करावी? उत्तराने पालटले नशीब

चॅटजीपीटीच्या आगमनाने व्यावसायिक जगतात मोठा बदल होऊ शकतो
ChatGPT
ChatGPT Sakal

Stock Picking Experiment: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वेगाने पुढे जात आहे. अलीकडील मीडिया रिपोर्ट्सचा दावा आहे की चॅटबॉट ChatGPT स्टॉक निवडीमध्ये काही लोकप्रिय गुंतवणूकदारांपेक्षा चांगला सल्ला दिला आहे.

ChatGPT द्वारे निवडलेल्या 38 शेअर्सच्या डमी पोर्टफोलिओमध्ये 6 मार्च ते 28 एप्रिल दरम्यान Finder.com ने केलेल्या प्रयोगात 4.9 टक्के वाढ झाली. त्याच वेळी, 10 प्रमुख गुंतवणूक फंडांनी सरासरी 0.8 टक्के घट नोंदवली.

व्यापार जगतात मोठा बदल:

अशा स्थितीत चॅटजीपीटीच्या आगमनाने व्यावसायिक जगतात मोठा बदल होऊ शकतो, अशी आशा अनेक जण व्यक्त करत आहेत. ChatGPT ने डिझाईन केलेल्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ असलेल्या फंडांनी फंड मॅनेजरने सुचविलेल्या स्टॉकपेक्षा चांगला परतावा दिला आहे.

यावरून असे दिसून आले की चॅट जीपीटीने सुचविलेल्या पोर्टफोलिओने फंड मॅनेजरच्या तुलनेत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. अशा परिस्थितीत, भविष्यात चॅट जीपीटी मानवी बुद्धिमत्तेच्या आधारावर अनेक कार्यांना आव्हान देऊ शकतो अशी अपेक्षा आहे.

ChatGPT
Five Day Working: बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आठवड्यातून फक्त 5 दिवस काम? पूर्ण करावी लागेल 'ही' अट

फंड मॅनेजर असे फंड निवडतात जे गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात. पण आता ChatGPT ने हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केले आहे. ChatGPT ने निवडलेल्या फंडांनी उत्कृष्ट परतावा दिला आहे.

ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ChatGPT ने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला त्यांच्याकडे कर्ज कमी होते. तसेच, एआयने त्यांच्या वाढीच्या इतिहासावर लक्ष केंद्रित केले. या कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स आणि वॉलमार्टसारख्या मोठ्या कंपन्या होत्या.

चॅट जीपीटीच्या सल्ल्यानुसार गुंतवणुकीचे निर्णय घेणे नवीन आहे. पण येणाऱ्या काळात त्यात सुधारणा करून फंड मॅनेजरपेक्षा चांगले परिणाम तुम्हाला देऊ शकतात.

कसे वापरू शकता?

तुम्हाला ChatGPT वापरायचे असल्यास, तुम्हाला OpenAI वर साइन अप करावे लागेल. काही देशांमध्ये त्याच्या वापरावर निर्बंध आहेत. ChatGPT ची नवे फीचर केवळ ChatGPT सदस्यांसाठी उपलब्ध आहे, ज्यासाठी दरमहा 20 डॉलर शुल्क आकारले जात आहे.

ChatGPT
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com