अटकेच्या नावाखाली फसवणूक!

पुण्यातील एका प्राध्यापक महिलेला, ‘तुमच्या मुलीला अटक केली आहे,’ असा फोन आला.
scam
scamsakal

- शिरीष देशपांडे, सीए आणि संगणक कंट्रोल, सायबर गुन्हेविषयक अभ्यासक

पुण्यातील एका प्राध्यापक महिलेला, ‘तुमच्या मुलीला अटक केली आहे,’ असा फोन आला. व्हॉट्सॲपवर आलेल्या या फोन करणाऱ्याचा डीपी थेट पोलिस अधिकाऱ्याचा असल्याचे पाहून प्राध्यापिका घाबरल्या. मात्र, लगेच सावध झाल्या. त्या माणसाची खूप उलटतपासणी केली. नवऱ्याला पण सावध केले. आपल्या मुलीने काय गुन्हा केला आहे, याची माहिती संबंधित प्राध्यापिका महिलेने घ्यायचा प्रयत्न केला.

पण तो चोरटा मुलीची सर्व माहिती आणि मित्रांची नावे यांचा संदर्भ देत होता. दरम्यान, त्यांच्या नवऱ्याने त्यांच्या मुलीला संपर्क साधला, ती सुखरूप आहे, याची खात्री केली आणि त्यांनी फोनचा ताबा घेऊन त्या चोरट्याला फैलावर घेतले आणि फसवणूक होण्यापासून स्वतःला वाचवले.

दुसऱ्या एका घटनेत, तुमच्या मुलीला अटक झाली आहे. ती आमच्या ताब्यात आहे. तिची सुटका करायची असेल तर ताबडतोब मी सांगतो त्या खात्यात एक लाख रुपये पाठवा, असा फोन पुण्यात हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलीच्या पालकांना गेला.

वडिलांनी घाबरून, आपली मुलगी अडचणीत असेल, असे समजून ताबडतोब एक लाख रुपये त्या तोतयाला ट्रान्स्फर केले. नंतर लक्षात आले, की तो फोन कॉल खोटा होता, मुलगी सुखरूप हॉस्टेलवरच होती. थोड्या वेळातच मुलीचा नेहमीप्रमाणे फोन आला आणि असे काहीच झाले नसल्याचे समजले.

असे फोन कोठूनही आले तरी घाबरून जाऊन पैसे पाठवायची घाई करू नये. असे फोन आल्यानंतर तातडीने आपल्या जवळच्या लोकांची मदत घेऊन पोलिस चौकीत निघायची तयारी करावी. घरात हजर असलेल्या किंवा शेजारच्या व्यक्तींची मदत घेऊन आपल्या मुलाला वा मुलीला संपर्क करून, खरोखरच असे काही झाले आहे का, हे बघावे. असा प्रसंग आपल्या कोणावरही येऊ शकतो. सोशल मीडियावरील आपल्या विविध खात्यांच्या सुरक्षिततेची तपासणी करावी.

आपल्या हातून पैसे पाठवले गेल्यास

  • https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

  • https://sancharsaathi.gov.in (chakshu) या साईटला भेट द्या. त्यावर मार्गदर्शक माहिती मिळेल.

  • त्वरित १९३०/१५५२६० या क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकावरची यंत्रणा योग्य ती कार्यवाही करेल. या क्रमांकावर फोन करायच्या आधी पैसे ट्रान्स्फर केल्याचा बँकेतून संदर्भ नंबर (Transaction ID) घ्यावा. पोलिसांना तो द्यावा लागू शकतो. असे केल्याने पोलिसांच्या मदतीने व्यवहार थांबवणे शक्य होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com