crude oil price
esakal
काही काळापासून सुरू असलेल्या चढ-उतारानंतर जुलैनंतर तेलाचे दर तुलनेने स्थिर झाले होते. मात्र, सप्टेंबरमध्ये पुन्हा कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत तीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. पश्चिम आशियात गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्यांचा या दरवाढीवर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यांमध्ये सौदी अरेबियातून येणाऱ्या जहाजांनाही लक्ष्य करण्यात आल्याने तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे.