Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग होणार? कच्च्या तेलाचा उडाला भडका; सलग तिसऱ्या दिवशी दरवाढ

इराणसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका मध्यपूर्वेत आणखी एक विमानवाहू युद्धनौका तैनात करण्याचा विचार करत असल्याने बाजारातील चिंता वाढली आहे.
Crude Oil Prices Rise for Third Consecutive Day

Crude Oil Prices Rise for Third Consecutive Day

esakal

Updated on: 

Crude Oil Prices Rise for Third Consecutive Day : कच्च्या तेलाच्या किमती सलग तिसऱ्या दिवशी वाढल्या आहेत. इराणसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका मध्यपूर्वेत आणखी एक विमानवाहू युद्धनौकांचा ताफा तैनात करण्याचा विचार करत आहे. यामुळे प्रादेशिक तणाव वाढू शकतो आणि तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो, या भीतीमुळे बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 'ब्रेंट क्रूड'चा भाव आता प्रति बॅरल १०२.६१ डॉलर्सवर पोहोचला आहे, तर 'डब्ल्यूटीआय' (WTI) ९३.१२ डॉलर्स प्रति बॅरलवर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com