Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

Kanhaiya Kumar Net Worth: ईशान्य दिल्ली लोकसभा जागेवर भाजपचे उमेदवार मनोज तिवारी आणि इंडिया आघाडीचे उमेदवार कन्हैया कुमार यांच्यात लढत होणार आहे.
Delhi Lok Sabha Election 2024 Manoj Tiwari richest Lok Sabha candidate Know Kanhaiya Kumar property
Delhi Lok Sabha Election 2024 Manoj Tiwari richest Lok Sabha candidate Know Kanhaiya Kumar property Sakal

Kanhaiya Kumar Property: ईशान्य दिल्ली लोकसभा जागेवर भाजपचे उमेदवार मनोज तिवारी आणि इंडिया आघाडीचे उमेदवार कन्हैया कुमार यांच्यात लढत होणार आहे. कन्हैया कुमार यांनी सांगितले की, जीएसटीचा फटका बसलेल्या ईशान्य दिल्लीतील तरुणांसाठी, दुकानदारांसाठी आम्हाला नोकऱ्या हव्या आहेत. आम्हाला दुकानदारांना जीएसटीपासून दिलासा हवा आहे, आम्हाला मजुरांना 400 रुपये रोजचे किमान वेतन हवे आहे.

मनोज तिवारी हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत

मालमत्तेबद्दल बोलायचे झाल्यास, भोजपुरी गायक आणि राजकारणी मनोज तिवारी हे दिल्लीतील लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या प्रमुख उमेदवारांपैकी सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.

मनोज तिवारी यांच्या मालमत्तेचा तपशील

  • वय: 53 वर्षे

  • शिक्षण: मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन

  • संपत्ती: 28.05 कोटी

  • व्यवसाय: अभिनेता आणि गायक

  • कार: पाच (मर्सिडीज-बेंझ ई-280, इनोव्हा, ऑडी क्यू-7, होंडा सिटी, फॉर्च्युनर)

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे एकूण 28.05 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याचवेळी मनोज तिवारी यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या कन्हैया कुमारची एकूण संपत्ती 10.65 लाख रुपये आहे. त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पीएचडी पदवी मिळवली आहे.

Delhi Lok Sabha Election 2024 Manoj Tiwari richest Lok Sabha candidate Know Kanhaiya Kumar property
Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

कन्हैया कुमार यांच्या मालमत्तेचा तपशील

  • वय : 37

  • शिक्षण: पीएचडी

  • संपत्ती: 10.65 लाख

  • व्यवसाय : सामाजिक कार्यकर्ता

  • कार: नाही

कन्हैया यांच्यावर किती कर्ज आहे?

कन्हैया यांच्यावर कोणतेही कर्ज आणि त्यांच्याकडे दागिने नाहीत. त्यांच्याकडे कोणतीही एफडी नाही किंवा त्यांनी शेअर मार्केटमध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही.

कन्हैया यांच्यावर नोंदवलेल्या फौजदारी गुन्ह्यांबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्यावर आसाम, बिहार आणि दिल्लीत एकूण सात गुन्हे दाखल आहेत. त्यांना कोणत्याही खटल्यात शिक्षा झालेली नाही.

Delhi Lok Sabha Election 2024 Manoj Tiwari richest Lok Sabha candidate Know Kanhaiya Kumar property
Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

यापैकी एक गुन्हा आसामच्या कामरूप जिल्ह्यात, चार गुन्हे बिहारच्या बेगुसरायमध्ये, एक गुन्हा बिहारची राजधानी पाटणामध्ये तर एक गुन्हा दिल्लीत दाखल आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी दिल्लीतील सातही लोकसभा जागांवर मतदान होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com