Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवाला यांची गणना देशातील आघाडीच्या गुंतवणूकदारांमध्ये केली जाते. गुंतवणूकदार त्यांच्या स्टॉक पोर्टफोलिओवर लक्ष ठेवतात. रेखा झुनझुनवाला यांना त्यांचे पती राकेश झुनझुनवाला यांच्याकडून हा पोर्टफोलिओ मिळाला आहे.
Rekha Jhunjhunwala loses rs 800 crore today What happened in the stock market
Rekha Jhunjhunwala loses rs 800 crore today What happened in the stock market Sakal

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवाला यांची गणना देशातील आघाडीच्या गुंतवणूकदारांमध्ये केली जाते. गुंतवणूकदार त्यांच्या स्टॉक पोर्टफोलिओवर लक्ष ठेवतात. रेखा झुनझुनवाला यांना त्यांचे पती राकेश झुनझुनवाला यांच्याकडून हा पोर्टफोलिओ मिळाला आहे. रेखा यांनी गुंतवणूक केलेल्या कंपन्या मल्टीबॅगर्स आहेत.

पण, रेखा झुनझुनवालासाठी सोमवारचा दिवस खूपच वाईट ठरला. एका दिवसात त्यांना अंदाजे 800 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. टायटन कंपनीतील त्यांच्या गुंतवणुकीत ही घसरण झाली आहे.

रेखा झुनझुनवाला यांची टायटनमध्ये 5.35 टक्के हिस्सेदारी

सोमवारी शेअर बाजारात टायटनचे शेअर्स सुमारे 5 टक्क्यांनी घसरले. कंपनीने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ही घसरण झाली आहे. रेखा झुनझुनवाला यांनी 31 मार्च 2024 पर्यंत टाटा समूहाच्या टायटन या कंपनीमध्ये 5.35 टक्के हिस्सा घेतला होता.

शुक्रवारी त्यांच्या स्टेकचे बाजारमूल्य 16,792 कोटी रुपये होते. टायटनचे मार्केट कॅप शुक्रवारी 3,13,868 कोटी रुपये होते. पण, सोमवारी टायटनच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. यासह, कंपनीचे मार्केट कॅप देखील 3 लाख कोटी रुपयांवरून 2,98,815 कोटी रुपयांवर घसरले आहे.

Rekha Jhunjhunwala loses rs 800 crore today What happened in the stock market
Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

टायटनचा शेअर 253 रुपयांनी घसरला

या घसरणीमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या स्टेकचे मूल्यही 15,986 कोटी रुपये झाले. अंदाजे 805 कोटी रुपयांची घट झाली आहे. टायटनने जानेवारी-मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ही घट झाली आहे. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 7 टक्क्यांनी वाढून 786 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

Rekha Jhunjhunwala loses rs 800 crore today What happened in the stock market
Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा आकडा 734 कोटी रुपये होता. कंपनीचा महसूलही 17 टक्क्यांनी वाढून 10,047 कोटी रुपये झाला आहे. असे असूनही, NSE वर टायटनचा शेअर 253 रुपयांनी घसरला आणि 3280 रुपयांवर बंद झाला.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com