digital upi auto reversal facility finance investment marathi news
digital upi auto reversal facility finance investment marathi newssakal

‘यूपीआय ऑटो रिव्हर्सल’ची सुविधा

डिजिटल पेमेंटचे आर्थिक व्यवहारातील प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

डिजिटल पेमेंटचे आर्थिक व्यवहारातील प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गेल्या वर्षभरात यूपीआयमार्फत होणाऱ्या व्यवहारांत सुमारे ६० टक्के वाढ झाली आहे, तर या व्यवहारांतून होणाऱ्या रकमेत सुमारे ४७ टक्के वाढ झाली आहे. पेमेंट करता येण्यातील सुविधा व तत्परता यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर यूपीआय पेमेंटला सातत्याने वाढता प्रतिसाद मिळत आहे.

मात्र, अनेकदा चुकीच्या खात्यावर पेमेंट केले जाते, तर कधी अनधिकृत पेमेंट झालेले असते, अशा वेळी ते पेमेंट रिव्हर्स करण्याची आवश्यकता भासते. यावर उपाय म्हणून ‘एनपीसीआय’ने यूपीआय ऑटो रिव्हर्सल हा पर्याय देऊ केला आहे.

‘यूपीआय ऑटो रिव्हर्सल’चा पर्याय

‘यूपीआय ऑटो रिव्हर्सल’मुळे सरसकट व्यवहार रिव्हर्स करता येत नाहीत. मात्र, काही विशिष्ट परिस्थितीत यूपीआयमार्फत झालेले व्यवहार रिव्हर्स करता येऊ शकतात. आपण अनवधानाने चुकीच्या मोबाईल नंबरवर किंवा चुकीच्या यूपीआय आयडीवर पेमेंट केले असेल, तर आपण रिव्हर्सलसाठी विनंती करू शकतो.

अनधिकृत पेमेंट झाले असल्याचे निदर्शनास आले, तर आपण त्वरित आपल्या बँकेस किवा यूपीआय सर्विस प्रोव्हायडरला तसे कळवू शकतो. एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे, की यूपीआयमार्फत केलेला जो व्यवहार पेंडिंग आहे किंवा जो व्यवहार फेल झालेला आहे, अशाच व्यवहारांसाठी यूपीआय ऑटो रिव्हर्सल ही सुविधा वापरता येते.

यूपीआय पेमेंट रिव्हर्स करण्यासाठी

  • व्यवहार चुकीचा अथवा अनधिकृत झाल्याचे लक्षात आल्यावर त्वरित आपल्या बँकेस किंवा यूपीआय सर्विस प्रोव्हायडरच्या (उदा. भीम, गुगलपे, फोनपे, पेटीएम) ग्राहकसेवा कक्षाशी संपर्क साधावा.

  • बँक अथवा सर्व्हिस प्रोव्हायडर संपर्क झाला, की त्यांना आपला चुकीच्या किंवा अनधिकृत झालेल्या व्यवहाराचा संपूर्ण तपशील (ट्रॅन्झॅक्शन रेफरन्स नंबर, रक्कम व वेळ) ई-मेल/एसएमएसने द्यावा.

  • अशा प्रकाराची माहिती संबंधित यंत्रणेला कळवताना वेळेला फार महत्त्व आहे. शक्य तितक्या लवकर कृती करावी. काही बँकांनी यासाठी वेळेची मर्यादा दिली आहे. त्यात रिक्वेस्ट केली, तरच कारवाई केली जाते.

  • बँक अथवा सर्व्हिस प्रोव्हायडरने रिव्हर्सल रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर लगेचच यूपीआय ऑटो रिव्हर्सलसाठीची पुढील कार्यवाही केली जाते. यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

  • यूपीआय ऑटो रिव्हर्सल प्रक्रिया पूर्ण झाली, की आपल्याला तशा आशयाचा ‘एसएमएस’ येतो व पुढील काही तासात आपल्या खात्यात नावे पडलेली रक्कम जमा केली जाते व तसा ‘एसएमएस’ही आपल्याला येतो.

  • रिव्हर्स रिक्वेस्ट शक्य तितकी लवकर म्हणजे व्यवहार पूर्ण होण्याच्या आत करणे आवश्यक आहे. विलंबाने केलेल्या विनंतीचा उपयोग होईलच असे नाही, हे लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे.

(लेखक सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com