
डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदाचा पगार फक्त 3.5 कोटी असला तरी त्यांचं एकूण नेट वर्थ तब्बल 5 अब्ज डॉलर्स आहे.
रिअल इस्टेट, क्रिप्टो, Truth Social, रॉयल्टी आणि गुंतवणूक हे त्यांचे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत आहेत.
टॅरिफद्वारे अमेरिकेची तिजोरी भरत असतानाच, ट्रम्प स्वतःचं भक्कम आर्थिक साम्राज्यही बळकट करत आहेत.
Donald Trump Net Worth: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील 69 देशांवर आयातशुल्क (टॅरिफ) लावून महसूल वसूल करणे सुरू केलं आहे. या निर्णयामुळे जुलै महिन्यात अमेरिकेच्या तिजोरीत तब्बल 2.5 लाख कोटी रुपये जमा झालेत. त्यामुळे एक प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय तो म्हणजे ट्रम्प यांना या टॅरिफमधूनही काही कमाई होते का? आणि त्यांची कमाई नक्की कुठून होते?