
देशभरात प्लॉट खरेदीत "डबल रजिस्ट्री फ्रॉड"चे प्रमाण वाढत असून एकाच भूखंडाची अनेकांना विक्री केली जात आहे.
टायटल इन्शुरन्स, एनकम्ब्रन्स सर्टिफिकेट आणि बँकेची पडताळणी यांसारख्या सोप्या उपायांनी या जाळ्यात अडकणं टाळता येऊ शकतं.
तज्ज्ञांचा सल्ला व कायदेशीर कागदपत्रांची नीट तपासणी करूनच प्लॉट खरेदीचा निर्णय घ्या.
Plot Investment Tips: पुण्या आणि मुंबईत प्लॉट घेऊन स्वप्नातील घर उभं करण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण ‘डबल रजिस्ट्री’ नावाच्या नव्या फसवणुकीने हे स्वप्न धुळीस मिळतंय. अंकुर (बदललेलं नाव) यांनी प्लॉट घेतल्यानंतर बँक कर्जासाठी अर्ज केला, तेव्हा धक्काच बसला. तोच प्लॉट आधीच इतराच्या नावावर नोंदणीकृत होता. चौकशीत समोर आलं की हा प्रकार अनेकांबरोबर घडला आहे आणि एकाच प्लॉटची 10–15 जणांना विक्री करून पैसे उकळले जात आहेत.