

Farm to Doorstep: How E-Commerce Is Helping Farmers Get Paid in Just 4 Hours
eSakal
India agriculture digital transformation: भारतात ई-कॉमर्स क्षेत्र झपाट्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम आता शेतकऱ्यांच्या जीवनावर दिसू लागला आहे. यात अमेझॉनने देशभरात आपले ऑपरेशन्स नेटवर्क मोठ्या प्रमाणात वाढवले असून, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी थेट आणि विश्वासार्ह बाजारपेठ मिळू लागली आहे. दैनंदिन खरेदीपासून ते ताज्या भाज्या आणि फळांच्या पुरवठ्यापर्यंत मोठे बदल होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवी चालना मिळत आहे.