FSSAI Order: FSSAIने दिला इशारा! कंपन्यांना हेल्थ आणि एनर्जी ड्रिंक्सच्या नावावर काहीही विकता येणार नाही

Health and Energy Drink: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या वेबसाइट्सद्वारे हेल्थ ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक सारख्या शब्दांचा गैरवापर करू नये असा इशारा दिला आहे.
Ecommerce companies can not sell every juice on the name of health and energy drink says fssai
Ecommerce companies can not sell every juice on the name of health and energy drink says fssai Sakal

Health and Energy Drink: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या वेबसाइट्सद्वारे हेल्थ ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक सारख्या शब्दांचा गैरवापर करू नये असा इशारा दिला आहे. FSSAI ने म्हटले आहे की वेबसाइट्सद्वारे विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे योग्य वर्गीकरण करावे आणि असे शब्द विक्री वाढवण्यासाठी वापरू नयेत.

FSS कायदा 2006 नुसार हेल्थ ड्रिंक या शब्दाची व्याख्या कुठेही केलेली नाही. मात्र ई-कॉमर्स वेबसाइटवर हेल्थ ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (FSSAI asks ecommerce platforms to stop using 'health drink' and 'energy drink' labels for malt based drinks)

FSSAI ने सर्व ई-कॉमर्स फूड बिझनेस कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवरील 'हेल्थ ड्रिंक्स/एनर्जी ड्रिंक्स' श्रेणीमधून अशी पेये काढून टाकून किंवा डी-लिंक करून तत्काळ सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. कोणतीही दिशाभूल करणारी माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचू नये अशा सूचना FSSAI ने कंपन्यांना दिल्या आहेत. कंपन्यांना FSS कायदा 2006 मधील तरतुदींचे पालन करावे लागेल.

Ecommerce companies can not sell every juice on the name of health and energy drink says fssai
Maharashtra Revenue : ‘जीएसटी’ संकलनात महाराष्ट्र अव्वल ; ‘जीएसटी’ लागू झाल्यापासून प्रथम स्थान कायम

Nielsen IQ च्या आकडेवारीनुसार, PepsiCo, Coca-Cola आणि Hell सारख्या कंपन्या रेड बुल आणि मॉन्स्टरच्या एक चतुर्थांश दराने त्यांचे एनर्जी ड्रिंक विकत आहेत. हे पेय किराणा दुकानात सहज उपलब्ध आहेत.

एनर्जी ड्रिंक्सची विक्री दरवर्षी सुमारे 50 टक्के दराने वाढत आहे. तरुणांमध्ये त्याचा वाढता वापर चिंताजनक आहे. अनेक संशोधनातून त्याचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम समोर आले आहेत. त्यामुळे एफएसएसएआयही याबाबत विचार करत आहे.

Ecommerce companies can not sell every juice on the name of health and energy drink says fssai
Reserve Bank of India : रेपोदर ‘जैसे थे’ राहण्याचा अंदाज ; महागाई नियंत्रणाला रिझर्व्ह बँकेचे प्राधान्य

FSSAI ने स्पष्ट केले आहे की FSS Act 2006 अंतर्गत हेल्थ ड्रिंकची कुठेही व्याख्या केलेली नाही. एनर्जी ड्रिंक्सचा वापर फक्त कार्बोनेटेड आणि कार्बोनेटेड वॉटर पेयांसाठी केला जाऊ शकतो. (FSSAI Directs Exclusion Of Select Drinks From Health, Energy Drink Category)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com