ED Notice: चीनी कंपनीला ईडीची नोटीस, 5,551 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

कंपनीचे अधिकारी आणि संबंधित बँकांनाही नोटीस पाठवली आहे.
ED Notice Xiaomi
ED Notice XiaomiSakal

ED Notice Xiaomi: परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. एजन्सीने चीनी मोबाईल फोन कंपनीचे CFO आणि संचालक समीर बी राव, माजी एमडी मनु कुमार जैन आणि तीन परदेशी बँकांना 5,551 कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

तपास यंत्रणेने शुक्रवारी एका निवेदनात ही माहिती दिली. त्यानुसार, FEMA च्या कलम 16 अंतर्गत परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत (FEMA) Xiaomi Technology India Private Limited ला नोटिस बजावली आहे.

कंपन्यांचे दोन अधिकारी, Citi Bank, HSBC Bank आणि Deutsche Bank AG ​​यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

FEMA प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर कारणे दाखवा नोटीस जारी केली जाते आणि जेव्हा प्रकरण निकाली काढले जाते तेव्हा आरोपीला उल्लंघनाच्या तिप्पट रकमेपर्यंत दंड भरावा लागतो.

एजन्सीने सांगितले की, शाओमीसह जैन आणि राव यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीने यापूर्वी बेकायदेशीर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात Xiaomi टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक खात्यांमध्ये जमा केलेले 5,551.27 कोटी रुपये जप्त केले होते.

देशातील मोबाईल फोन मार्केटवर चिनी कंपन्यांचे वर्चस्व आहे. यामध्ये Xiaomi, Oppo, Vivo आणि Huawei यांचा समावेश आहे. भारतातील या कंपन्या मोठ्या प्रमाणावर पैसे कमावतात पण त्या कंपन्या कर भरत नाहीत.

सरकारने या कंपन्यांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी सविस्तर मल्टी-एजन्सी चौकशी सुरू केली आहे. यामध्ये या कंपन्यांचे कारनामे समोर येत आहेत.

ED Notice Xiaomi
Mumbai : बँक ऑफ बडोदा रुपे क्रेडिट कार्ड आता यूपीआय वरही वापरता येणार

चिनी कंपन्यांवर त्यांच्या उत्पन्नाची माहिती लपवणे, कर टाळण्यासाठी नफ्याची नोंद न करणे आणि भारतीय बाजारपेठेतील आपले वर्चस्व वापरून देशांतर्गत उद्योग उद्ध्वस्त केल्याचे आरोप आहे.

यासोबतच चिनी कंपन्यांवर उत्पादन वितरणात पारदर्शकता नसल्याचा आरोप आहे. सरकार सर्व संभाव्य मुद्द्यांचा तपास करत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयही यावर बारीक लक्ष ठेवून आहे.

ED Notice Xiaomi
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com