Manappuram Finance: मोठी बातमी! मणप्पुरम फायनान्सवर ईडीची कारवाई, व्ही.पी नंदकुमार यांच्या घराची घेतली झडती

मणप्पुरम फायनान्स लिमिटेड समूहाच्या ठिकाणी झडती घेतली आहे.
Manappuram Finance
Manappuram FinanceSakal

Manappuram Finance: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केरळमधील थ्रिसूरमधील मणप्पुरम फायनान्स लिमिटेड समूहाच्या ठिकाणी झडती घेतली आहे. प्रमोटर व्हीपी नंदकुमार यांचे मुख्यालय आणि निवासस्थानावरही झडती घेण्यात आली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) परवानगीशिवाय लोकांकडून 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी बेकायदेशीरपणे गोळा केल्याच्या आरोपावरून ईडीकडून झडती घेण्यात आली. केवायसी नियमांचे पालन न करता मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करत असल्याचाही संशय आहे. असे वृत्त Business Today ने दिले आहे.

मणप्पुरम फायनान्सचे शेअर्स बुधवारच्या व्यापारात 4 टक्क्यांनी घसरले कारण अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केरळमधील त्रिशूरमधील मणप्पुरम समूहाच्या परिसरात अनेक ठिकाणी झडती घेतली.

स्टॉक 4.47 टक्क्यांनी घसरून बीएसईवर 123.85 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दोन आठवड्यांच्या सरासरी 2.85 लाख शेअर्सच्या तुलनेत आतापर्यंत एकूण 4.39 लाख शेअर्सचे व्यवहार झाले.

ही बातमी अशा वेळी आली जेव्हा मणप्पुरम फायनान्सचे बोर्ड या महिन्याच्या शेवटी डेट सिक्युरिटीज जारी करण्याचा विचार करत होते.

Manappuram Finance
Unemployment in India: निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या बेरोजगारीत मोठी वाढ; मोदीं समोर मोठे आव्हान

कंपनीतील प्रमोटरांचा हिस्सा 35.2 टक्के आहे. गेल्या 5 तिमाहीत 35.06 च्या तुलनेत आता तो 35.2 टक्के आहे. FII म्हणजेच विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी केले आहेत.

गेल्या 5 तिमाहीत त्यांचा हिस्सा 29.83 टक्क्यांवरून 30.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत जानेवारी-मार्च तिमाहीत हिस्सा 30.07 टक्क्यांवरून 30.17 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

DII म्हणजेच देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही शेअरमध्ये जोरदार खरेदी केली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत जानेवारी-मार्च तिमाहीत त्यांचा हिस्सा 11.57 टक्क्यांवरून 13.54 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

Manappuram Finance
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com