
फेब्रुवारी ते जून 2025 दरम्यान RBI ने रेपो रेटमध्ये 1 टक्क्यांची कपात केली असून, 4-6 ऑगस्टला मौद्रिक धोरण समितीची पुढील बैठक होणार आहे.
किरकोळ महागाई दर लक्ष्याखाली (2.82%-3.4%) राहिल्याने रेपो रेटमध्ये आणखी कपातीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ओपेककडून उत्पादनात वाढ झाल्याने तेलाच्या किमती कमी होतील.
RBI MPC Meeting: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फेब्रुवारी ते जून या कालावधीत रेपो रेटमध्ये एकूण 1 टक्क्यांची कपात केली आहे. आता, RBI च्या मौद्रिक धोरण समितीची (MPC) पुढील बैठक 4 ते 6 ऑगस्टदरम्यान होणार आहे. या बैठकीकडे बाजाराचे लक्ष लागले आहे, कारण किरकोळ महागाई दर (CPI) घसरल्याने रेपो रेटमध्ये आणखी कपातीची शक्यता वाढली आहे.