EPFO: देशात नोकऱ्यांमध्ये झाली वाढ; 15 लाखांहून अधिक सदस्यांचा EPFOमध्ये समावेश, कोणते राज्य आघाडीवर?

EPFO Members: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने डिसेंबर 2023 मध्ये एकूण 15.62 लाख सदस्य जोडले आहेत. यासंदर्भातील EPFO ​​च्या वेतनाची आकडेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यात नोकऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे.
Epfo Adds A Net 15.62 Lakh Members In Dec; 8.41 Lakh New Subscribers Join Workforce
Epfo Adds A Net 15.62 Lakh Members In Dec; 8.41 Lakh New Subscribers Join Workforce Sakal

EPFO Data: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने डिसेंबर 2023 मध्ये एकूण 15.62 लाख सदस्य जोडले आहेत. यासंदर्भातील EPFO ​​च्या वेतनाची आकडेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली.

कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मागील महिन्याच्या म्हणजेच नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत या महिन्यात 11.97% अधिक ग्राहक जोडले गेले आहेत. जर आपण वर्षभराचा विचार केला तर डिसेंबर 2022 च्या तुलनेत या वर्षी याच महिन्यात EPFO ​​सदस्यांमध्ये 4.62 टक्के वाढ झाली आहे. (Epfo Adds 15.62 Lakh Members In Dec 2023 Highest In Last Three Months)

आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की डिसेंबर 2023 मध्ये EPFO ​​मध्ये सुमारे 8.41 लाख नवीन सदस्यांची नोंदणी झाली होती, जी नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत 14.21 टक्के अधिक आहे. आकडेवारी पाहता नवीन सदस्यांमध्ये 18 ते 25 वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.

Epfo Adds A Net 15.62 Lakh Members In Dec; 8.41 Lakh New Subscribers Join Workforce
Ramesh Bais : रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीत भरीव वाढ ; रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीत भरीव वाढ

डिसेंबरमध्ये जोडलेल्या एकूण नवीन सदस्यांपैकी त्यांची टक्केवारी 57.18 टक्के आहे. पेरोल डेटानुसार सुमारे 12.02 लाख सदस्य ईपीएफओमधून बाहेर पडले आणि नंतर पुन्हा ईपीएफओमध्ये झाले.

निवेदनानुसार 8.41 लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे 2.09 लाख महिला सदस्य आहेत, ज्या पहिल्यांदाच EPFO ​​मध्ये जोडल्य गेल्या आहेत. नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत यात 3.54 टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि हरियाणा येथून जास्तीत जास्त सदस्य सहभागी झाले होते.

Epfo Adds A Net 15.62 Lakh Members In Dec; 8.41 Lakh New Subscribers Join Workforce
Zee-Sony Merger : विलीनीकरण व्यवहाराबाबत ‘झी-सोनी’ची पुन्हा चर्चा सुरू

नोकऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढला

आकडेवारीनुसार 8.41 लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे 2.09 लाख नवीन सदस्य महिला आहेत. हा आकडा गेल्या तीन महिन्यांतील महिला कर्मचाऱ्यांमध्ये नोंदलेली सर्वाधिक वाढ आहे.

नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत गेल्या महिन्यात एकूण महिला सदस्यांमध्ये 7.57% वाढ दिसून आली. शिवाय, डिसेंबर महिन्यात निव्वळ महिला सदस्यांची संख्या सुमारे 2.90 लाख होती, जी नोव्हेंबर 2023 च्या मागील महिन्याच्या तुलनेत सुमारे 3.54% नी वाढली आहे.

कोणत्या उद्योगात काम करणारे लोक सर्वाधिक EPF ग्राहक?

उद्योगनिहाय आकडेवारीनुसार लोह आणि पोलाद, इमारत आणि बांधकाम, सामान्य विमा या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा यामध्ये सर्वाधिक वाटा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com