

EPFO ATM Card And Mobile App: जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. EPFO चे ATM कार्ड आणि मोबाईल ॲप लवकरच लॉन्च होणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी EPFO एटीएम कार्ड आणि मोबाईल ॲप लॉन्च करण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
मनसुख मांडविया म्हणाले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे मोबाइल ॲप आणि डेबिट कार्ड सुविधा या वर्षी मे-जूनपर्यंत सुरू होईल.