

EPFO PF Withdrawal Rules
esakal
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ईपीएफ ॲडव्हान्स मिळवण्याच्या नियमांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. EPFO ने स्पष्ट केले आहे की, गरजेच्या वेळी पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ करण्यात आली आहे. EPFO च्या म्हणण्यानुसार, सदस्य काही विशिष्ट परिस्थितींमध्ये निवृत्तीपूर्वी त्यांच्या जमा असलेल्या PF निधीतील काही रक्कम काढू शकतात. यामध्ये शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि घराशी संबंधित गरजांचा समावेश होतो.पण, पैसे काढण्यासाठी विहित नियम आणि पात्रतेच्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.