
PF Withdrawals via ATM
Sakal
PF Withdrawals via ATM: देशभरातील सुमारे 7.8 कोटी ईपीएफओ (EPFO) सदस्यांसाठी मोठी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) जानेवारी 2026 पासून एक अशी सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आपले पीएफचे पैसे थेट एटीएममधून काढता येतील. म्हणजेच, पैसे मिळवण्यासाठी आता ऑनलाइन क्लेम करावा लागणार नाही.