

How To Check PF Balance On WhatsApp
esakal
EPFO WhatsApp Service: Check PF Balance Instantly : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सदस्यांसाठी पीएफ खात्याशी संबंधित डिजिटल सेवा अधिक सुलभ करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता व्हॉट्सॲपच्या (WhatsApp) माध्यमातून पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम, ईपीएफ पासबुक आणि खात्यातील शेवटचे पाच व्यवहार तपासण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पीएफ खात्याची माहिती मिळवण्यासाठी वारंवार वेबसाइटवर जाण्याची गरज कमी होऊ शकते. याशिवाय, दीर्घकाळ निष्क्रिय असलेल्या काही पीएफ खात्यांमधील शिल्लक रक्कम आपोआप निकाली काढण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा