SIP Investment: ‘एसआयपी’ने नोंदविले नवे विक्रम; जानेवारी महिन्यात गुंतवणुकीसह खात्यांची संख्याही सर्वोच्च

January SIP Investments Hit a Milestone: जानेवारी महिन्यात म्युच्युअल फंड ‘एसआयपी’ने गुंतवणूक, खात्यांची एकूण संख्या आणि नव्या खात्यांची संख्या अशा तीनही प्रकारात नवे विक्रम नोंदविले आहेत. या महिन्यात ‘एसआयपी’द्वारे १८,८३८ कोटी रुपयांची सर्वोच्च गुंतवणूक झाली
Equity MF inflows hit a near 2-year high in January, SIPs at record rs 18,839 crore
Equity MF inflows hit a near 2-year high in January, SIPs at record rs 18,839 croreSakal

मुंबई: जानेवारी महिन्यात म्युच्युअल फंड ‘एसआयपी’ने गुंतवणूक, खात्यांची एकूण संख्या आणि नव्या खात्यांची संख्या अशा तीनही प्रकारात नवे विक्रम नोंदविले आहेत. या महिन्यात ‘एसआयपी’द्वारे १८,८३८ कोटी रुपयांची सर्वोच्च गुंतवणूक झाली असून, खात्यांची एकूण संख्याही विक्रमी ७९१.७१ लाखांवर पोहोचली आहे, तर नव्या एसआयपींची नोंदणी सर्वाधिक ५१.८४ लाख झाली आहे. (SIP inflows hit new record)

इक्विटी म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणुकीनेही जानेवारीमध्ये २२ हजार कोटींचा विक्रमी टप्पा गाठला आहे. म्युच्युअल फंडांची शिखर संघटना ‘अॅम्फी’ने आज प्रसिद्ध केलेल्या मासिक अहवालात ही माहिती दिली आहे. (January SIP Investments Hit a Milestone)

म्युच्युअल फंडांमध्ये ‘एसआयपी’द्वारे डिसेंबरमध्ये १७,६१० कोटींची गुंतवणूक होती, तर खात्यांची संख्या डिसेंबरमध्ये ७६३.६५ लाख होती. डिसेंबरमध्ये नव्या ‘एसआयपीं’ची संख्या ४०.३२ लाख होती. इक्विटी फंडांमध्ये जानेवारीमध्ये एकूण २१,७८० कोटींची गुंतवणूक झाली आहे. डिसेंबरमधील १६,९९७ कोटींपेक्षा ती २८ टक्क्यांनी अधिक आहे, असेही ‘अॅम्फी’ने म्हटले आहे. (Equity MF inflows hit a near 2-year high in January, SIPs at record rs 18,839 crore)

म्युच्युअल फंडांची व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) जानेवारीमध्ये चार टक्क्यांनी वाढून ५२.७४ लाख कोटी रुपये झाली. डिसेंबरमध्ये ती ५०.७७ लाख कोटी रुपये होती. फोकस्ड फंडातून २०१ कोटी रुपये काढून घेण्यात आले. बँकिंग आणि पीएसयू फंडांमध्ये सर्वाधिक ५०१ कोटी रुपयांची आवक झाली.

हायब्रीड फंडांमधील गुंतवणुकीत ३७ टक्के वाढ दिसून आली. डिसेंबरमधील १५,००९ कोटींच्या तुलनेत जानेवारीमध्ये या फंडांमध्ये एकूण २०,६३६ कोटींची गुंतवणूक झाली. आर्बिट्रेज फंडांमध्ये १०,६०८ कोटींची, तर मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंडांमध्ये सर्वाधिक ७,०७९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

Equity MF inflows hit a near 2-year high in January, SIPs at record rs 18,839 crore
Ratan Tata: रतन टाटांचे वयाच्या 86व्या वर्षी स्वप्न होणार पूर्ण, वर्षानुवर्षे रखडलेला पेट प्रकल्प लागणार मार्गी

डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंडामध्ये १,३३९ कोटी रुपयांची आवक झाली. इंडेक्स फंड व ‘ईटीएफ’चा समावेश असलेल्या ‘अन्य’ श्रेणीमध्ये जानेवारीमध्ये ३,९८२.८५ कोटी रुपयांचा ओघ आला.

म्युच्युअल फंडांची ही विक्रमी आकडेवारी देशभरातील वाढती आर्थिक साक्षरता आणि माहितीपूर्ण गुंतवणुकीची संस्कृती वाढवण्यासाठी म्युच्युअल फंडांनी केलेल्या प्रयत्नांचे यश अधोरेखित करते. नियामक सुधारणांमुळेही चालना मिळत असून ‘एसआयपी’कडील वाढता कल भारतीय म्युच्युअल फंड उद्योग शाश्वत वाढीच्या मार्गावर पुढे जात आहे.

- व्यंकट चालसानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘अॅम्फी’

Equity MF inflows hit a near 2-year high in January, SIPs at record rs 18,839 crore
Paytm: ...म्हणून RBIने पेटीएमवर कारवाई केली; गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितला पुढचा प्लॅन

गुंतवणुकीची आकडेवारी

  • थीमॅटिक फंडांमध्ये सर्वाधिक ४८०४ कोटी रुपये

  • स्मॉल कॅप फंडांमध्ये ३२५६ कोटी रुपयांची दुसरी सर्वाधिक गुंतवणूक

  • मल्टी-कॅपमध्ये ३,०३८ कोटी, लार्ज कॅपमध्ये १,२८७ कोटी रुपये

  • डेट फंडांमध्ये ७६,४६८ कोटी रुपये, लिक्विड फंडांमध्ये ४९,४६७ कोटी रुपये

  • इंडेक्स फंडांमध्ये २९८७ कोटी रुपये

  • ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये ६५७ कोटी, तर अन्य ‘ईटीएफ’मध्ये ५७१ कोटी रुपये

  • नव्या १७ ओपन एंडेड योजनांमध्ये ६,४३३ कोटी रुपये जमा

  • तीन क्लोज-एंडेड योजनांमध्ये ३८४ कोटी रुपयांची गुंतवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com