

FD Interest Rates: Which Bank Offers the Highest Interest on ₹1 Lakh FD? 3 Banks Offering Over 8%
eSakal
1 Lakh FD Interest Rate: सध्याच्या शेअर बाजारातील चढ-उतार आणि गुंतवणुकीतील जोखीम टाळून जर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवायचे असतील तर बँकेची मुदत ठेव म्हणजेच FD हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. FD मध्ये ठरावीक कालावधीसाठी पैसे ठेवले की त्यावर आधीच निश्चित केलेल्या दराने महिन्याला व्याज मिळते. त्यामुळे किती परतावा मिळू शकतो, याचा अंदाज गुंतवणूकदारांना घेता येतो.