First Cabinet Meet: पीएम आवास योजनेंतर्गत 3 कोटी नवीन घरे बांधण्यात येणार; कॅबिनेटने दिली मंजुरी, कोणाला होणार फायदा?

First Cabinet Meet: मोदी सरकारने तिसऱ्या कार्यकाळात प्रधानमंत्री आवास योजनेची व्याप्ती वाढवली आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळात 3 कोटी अतिरिक्त कुटुंबांना या योजनेत आणण्यास मंजुरी देण्यात आली.
First Cabinet Meet
First Cabinet MeetSakal

Pradhan Mantri Awas Yojana: मोदी सरकारने तिसऱ्या कार्यकाळात प्रधानमंत्री आवास योजनेची व्याप्ती वाढवली आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळात 3 कोटी अतिरिक्त कुटुंबांना या योजनेत आणण्यास मंजुरी देण्यात आली. 3 कोटी अतिरिक्त घरे ग्रामीण आणि शहरी भागात बांधली जातील. गेल्या 10 वर्षांत पात्र गरीब कुटुंबांसाठी एकूण 4.21 कोटी घरे बांधण्यात आली आहेत.

ग्रामीण आणि शहरी भागातील पात्र कुटुंबांना मूलभूत सुविधांसह घरे बांधण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने भारत सरकार 2015-16 पासून प्रधानमंत्री आवास योजना चालवत आहे. PMAY अंतर्गत गेल्या 10 वर्षांत पात्र गरीब कुटुंबांसाठी एकूण 4.21 कोटी घरे बांधण्यात आली आहेत.

PMAY अंतर्गत बांधण्यात आलेल्या सर्व घरांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या इतर योजनांच्या सहकार्याने घरगुती शौचालय, LPG कनेक्शन, वीज कनेक्शन, घरगुती नळ कनेक्शन यासारख्या इतर मूलभूत सुविधा देखील पुरवल्या जातात.

First Cabinet Meet
PM Modi Salary : पंतप्रधानांना देखील भरावा लागतो टॅक्स? कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्री यांच्या पगारामध्ये नेमका फरक काय

PMAY अंतर्गत कोण पात्र आहे?

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ज्या कुटुंबांकडे कायमस्वरूपी घर नाही तेच पात्र आहेत. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर कायमस्वरूपी घर असू नये. यासोबतच कुटुंबातील कोणताही सदस्य राज्य किंवा केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभार्थी नसावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये असावे आणि कुटुंबासाठी बीपीएल शिधापत्रिका असणे अत्यंत आवश्यक आहे.

First Cabinet Meet
Sangli GST Collection : सांगली जिल्ह्याच्या जीएसटीच्या संकलनात ३० टक्के वाढ; मे महिन्यात १३६ कोटी रुपये कर वसुली

पंतप्रधान आवास योजनेचे फायदे

  • PMAY योजनेमुळे कच्चा किंवा तात्पुरत्या घरात राहणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी घरे मिळण्यास मदत होते.

  • एखाद्या व्यक्तीकडे जमीन असेल तर तो घर बांधण्यासाठी या योजनेतून आर्थिक मदतही घेऊ शकतो.

  • या योजनेअंतर्गत सरकार गृहकर्जावर सबसिडी देते. अनुदानाची रक्कम घराच्या आकारावर आणि उत्पन्नाच्या पातळीवर अवलंबून असते.

  • या योजनेअंतर्गत बँकांना कमी व्याजदरात गृहकर्ज देण्यास प्रोत्साहन दिले जाते.

  • PMAY योजनेअंतर्गत गृहकर्जासाठी जास्तीत जास्त परतफेड कालावधी 20 वर्षे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com