
Anil Ambani Reliance Infra: अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने भारताच्या संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीने चार प्रकारच्या नवीन 155 मिमी तोफेच्या गोळ्यांचे डिझाइन आणि काम पूर्ण केले आहे. हे काम पुण्यातील डीआरडीओच्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ARDE) सोबतच्या डिझाईन-कम-प्रॉडक्शन पार्टनरशिप अंतर्गत करण्यात आले आहे.