Young Billionaire List : जगातील बहुतांश तरुण अब्जाधीशांना वारशाने मिळाली संपत्ती; रिपोर्टमध्ये बाब उघड

सायरस मिस्त्री यांच्या झाहान आणि फिरोज मिस्त्री या मुलांनी ९.८ अब्ज डॉलर संपत्तीसह भारतातील ३० वर्षांखालील तरुण अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
Young Billionaire List
Young Billionaire ListeSakal

Forbes Young Billionaire List : फोर्ब्स मासिकाने नुकत्याच जाहीर केलेल्या भारतातील ३० वर्षांखालील अब्जाधीशांच्या यादीत टाटा सन्सचे माजी अध्यक्ष दिवंगत सायरस मिस्त्री यांच्या झाहान आणि फिरोज यांचा समावेश झाला आहे.

फोर्ब्सच्या यादीनुसार, जागतिक स्तरावर पहिल्या २५ सर्वांत तरुण अब्जाधीशांचे वय सरासरी ३३ वर्षे किंवा त्याहून कमी आहे. या २५ तरुण अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती ११० अब्ज डॉलर आहे. या तरुण अब्जाधीशांना ही संपत्ती वारशाने मिळाली आहे.

सायरस मिस्त्री यांच्या झाहान आणि फिरोज मिस्त्री या मुलांनी ९.८ अब्ज डॉलर संपत्तीसह भारतातील ३० वर्षांखालील तरुण अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. झाहान आणि फिरोज मिस्त्री यांनी प्रत्येकी ४.९ अब्ज डॉलरची संपत्ती मिळाली आहे.

सायरस मिस्त्री टाटा सन्सचे माजी अध्यक्ष होते, २०२२ मध्ये एका मोटार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. प्रख्यात शापुरजी पालनजी उद्योगसमूहाची सूत्रे सांभाळणाऱ्या सायरस मिस्त्री यांनी त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपला भाऊ शापूर मिस्त्री यांच्याकडे पालनजी समूहाची सूत्रे सोपवली.

Young Billionaire List
Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या योजनेचे 71 हजार खाते; मालेगावी नववर्षात जोरदार प्रतिसाद

फिरोज मिस्त्री

वय : २७ वर्षे, मुंबई

  • वॉरविक विद्यापीठाचे माजी विद्यार्थी

  • टाटा सन्समधील १८.४ टक्के हिस्सा

  • पालनजी समूहात २५ टक्के हिस्सा

झाहान मिस्त्री

वय : वर्षे २५, मुंबई

  • येल विद्यापीठाचे माजी विद्यार्थी

  • टाटा सन्समधील १८.४ टक्के हिस्सा

  • पालनजी समूहातील २५ टक्के हिस्सा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com