

Free FASTag Money: Get ₹1000 Directly in Your FASTag – Here’s How!
eSakal
FASTag 1000 Rewards: हायवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 10 एप्रिलपासून FASTag वापरणे अनिवार्य केल्यानंतर नागरिकांच्या सुविधेसाठी मोठं पाऊल उचलल आहे. आपण सगळेच कधी ना कधी टोल प्लाझावर स्वच्छतागृहात जातो. पण तिथे असलेल्या टॉयलेट्समधील घाण, दुर्गंधी आणि खराब सुविधा बघून आपली इच्छा जाते. ही समस्या नवीन नाही. पण आता सरकारने यावर एक भन्नाट उपाय शोधला असून या कामात तुम्हालाच सहभागी करून घेतलं आहे. त्यासाठी तुम्हाला थेट 1,000 रुपयांचं बक्षीसही मिळू शकतं.