
Hurun India Rich List: हुरुन इंडिया रिच 2024 लिस्टने नवा विक्रम केला आहे. यामध्ये भारतातील श्रीमंतांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. प्रथमच या यादीने 1,500चा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये 1,539 व्यक्तींचा समावेश आहे ज्यांची एकूण संपत्ती 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
हुरुन इंडियाच्या रिच लिस्टमध्ये गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला आहे. गेल्या वर्षी भारतात दर 5 दिवसांनी एक नवीन अब्जाधीश निर्माण झाल्याचे अहवालात म्हटले आहे.