
Germany Attracts Skilled Indian
Sakal
अमेरिकेतील H-1B व्हिसा अनिश्चिततेमुळे जर्मनी भारतीय कुशल कामगार/व्यावसायिकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध करुन देत आहे.
जर्मन अॅम्बॅसडर यांनी IT, मॅनेजमेंट, सायन्स आणि टेक क्षेत्रातील तज्ज्ञांना जर्मनीत काम करण्याचे आवाहन केले.
जर्मनीत भारतीयांची पगार सरासरी जर्मन कर्मचार्यांपेक्षा जास्त असून, स्थिर स्थलांतर पॉलिसीमुळे हा पर्याय भारतीयांसाठी खुला आहे.
US H-1B Visa: अमेरिकेतील H-1B व्हिसा कार्यक्रमाच्या अनिश्चिततेमुळे अनेक भारतीय लोक आता पर्यायी संधी शोधत आहेत. याच पार्श्वभूमीवर जर्मनीने भारतातील कुशल व्यावसायिकांना/ कामगारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
जर्मन अॅम्बॅसडर फिलिप अॅकरमन यांनी भारतीय तज्ज्ञांसाठी जर्मनीमध्ये मोठ्या संधी असल्याचे सांगितले. त्यांनी युरोपच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत भरपूर करिअरच्या संधी असल्याचे नमूद केले.